डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद!

May 4, 2015 8:22 PM0 commentsViews:

04 मे : पुण्यातील दांडेकर पूल इथल्या राजेंद्रनगरमध्ये शेजारी राहणार्‍या तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या कण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या शनिवारी ही घडली असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

अभिजित मच्छींद्र मारणे असं जखमी तरुणाचं नाव आहे. अभिजीत हा पार्किंगमधून दुचाकी काढत असताना धनंजय मोरे यानं त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात फरशी घातली. बेशुद्ध झालेल्या अभिजितच्या कंबरेवर, छातीवर, डोक्यावर आणि पायांवर शिवाजी मोरे यानं पाच ते सहा वेळा दगड घातल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतं आहे. जखमी अभिजीतवर सध्या ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिजीत मारणेचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय शिवाजी मारेला होता. हाच राग मनात धरून त्याने अभिजीतचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची पीडिताची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी आरोपीचीच तक्रार दाखल करून घेतली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close