सांगलीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 11 जणांचा मृत्यू

May 5, 2015 11:52 AM0 commentsViews:

sangli

05  मे : कवठेएकंद येथील फटाक्याच्या कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा 11वर पोहचला आहे. या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या 5 जणांचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

कवठेएकंद-तासगाव मार्गावरील ‘इगल फायर वर्क्स’ या कारखान्यात सोमवारी सायंकाळी शक्तीशाली स्फोट झाला होता. या दुर्घटनेत होरपळल्याने सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पाज जण गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान या पाचही जखमींचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या 11वर पोहचली आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात एकुण 11 कामगार होते. शोभेच्या दारूपासून फटाके तयार करीत असताना हा स्फोट झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close