मोगा प्रकरणावरून संसदेत गदारोळ

May 5, 2015 12:53 PM0 commentsViews:

loksabha_today305 मे : पंजाबमधील मोगा तरुणी मृत्यूप्रकरणाचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. या प्रकरणावर काँग्रेसने सादर केलेला स्थगत प्रस्ताव सभापतींनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा दोन वेळा, तर राज्यसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

चार दिवसांच्या सुटीनंतर आज सकाळी संसदेचे कामकाज सुरू झाले. पंजाबमधील मोगा छेडछाड प्रकरणावर आक्रमक झालेल्या काँग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला. मात्र, सभापतींनी काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले.

सभागृहात चर्चेदरम्यान बसचे मालक असणार्‍या बादल परिवाराविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसंच, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर, राज्यसभेतही मोगा छेडछोड प्ररकरणावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close