अंधश्रद्धेतून अंगणवाडी सेविकेची निर्घृण हत्या

May 5, 2015 1:05 PM0 commentsViews:

05 मे : जादूटोणाविरोधी कायदा अंमलात येऊनही राज्यात अंधश्रद्धेचे बळी थांबत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातल्या तरोडा या गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका अंगणवाडी सेविकेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सुनंदा विजय धबाले असं या मृत महिलेचं नाव आहे. याबाबत अटक केलेल्या आरोपींनी जादूटोण्याच्या संशयावरुनचं हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. सुनंदा यांच्या घराशेजारी तिचा दिर जयवंत धबाले याच घर आहे. जयवंतची बायको सतत आजारी पडायची, यामध्ये सुनंदा काही जादूटोणा, करणी करत असावी असा त्याचा संशय होता. त्यावरुन तो नेहमी सुंनदाला शिवीगाळ करुन त्रास द्यायचा. 1 मे रोजी सुनंदा कामावर जाण्यासाठी निघाली असतांना आरोपी, त्याची पत्नी आणि दोन मुलांनी मिऴून सुनंदावर कुर्‍हाडीनं हल्ला केला. उपचारासाठी नेत असतांनाच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी फक्त 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून जादूटोणा कलमाचा वापर केला नसल्याचा आरोप अनिसच्या कार्यकर्त्यांनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close