पोलिसांची हॉस्पिटमध्ये दादागिरी, रुग्णांना बेडवरून हुसकावले

May 5, 2015 5:05 PM0 commentsViews:

up police05 मे : जनतेचे रक्षकच किती असंवेदनशील असू शकता याचे जिवंत उदाहरण उत्तरप्रदेशमधील मोरादाबादमध्ये एका हॉस्पिटलमध्ये पाहण्यास मिळालं. पोलिसांनी रुग्णांना बेडवरून हुसकावून लावले आणि बेडचा ताबा घेऊन ढाराढुर झोपा काढत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.

घडलेली हकीकत अशी की, मोरादाबादमधल्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोलीस एका आरोपी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. असता रुग्णांचा त्यांनी दमदाटी केली. रुग्णासाठी असलेल्या इमर्जन्सी वॉर्डमधल्या बेडचा पोलिसांनी ताबा घेतला. पोलीस रुग्णांच्या बेडवर झोपले आणि रुग्णांना जमिनीवर झोपवायला भाग पाडलं. हा सगळाप्रकार मोबाईलमध्ये कैद झाला. पोलिसांच्या या प्रतापामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close