वाद कुमार विश्वास यांचा, राजीनामा महिला आयोगाच्या सदस्याचा !

May 5, 2015 5:37 PM0 commentsViews:

juhi khan05 मे : आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यावर झालेल्या आरोपावरून आज दिल्ली महिला आयोगातच फूट पडली. समन्स बजावूनही आयोगासमोर हजर न राहणार्‍या विश्वास यांना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी विश्वास यांना अहंकारी म्हटलं. पण, यावर आक्षेप घेत जुही खान नावाच्या सदस्याने विश्वास यांची बाजू घेतली आणि थेट राजीनामाच देऊन टाकला.

आम आदमी पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने कुमार विश्वास यांच्यावर केलेल्या आरोपांची महिला आयोगाने गंभीर दखल घेतलीय. त्यामुळे कुमार विश्वास अडचणीत आले आहे. आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी महिला आयोगाने विश्वास यांना दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. पण आपल्याला असं कोणतंही समन्सम मिळालेलंच नाही असं विश्वास यांच म्हणणं आहे. त्यावर महिला आयोगाने आज त्यांना नव्याने नोटीस पाठवलीय. पण याच मुद्द्यावरून महिला आयोगाच्या सदस्य असणार्‍या जुही खान यांनी मात्र वेगळी भूमिका घेत राजीनामा दिलाय. कुमार विश्वास निर्दोष असून त्यांना अडकवलं जात असल्याचं जुही यांचं म्हणणं आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close