दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नाही, गृहमंत्रालयाची सारवासारव

May 5, 2015 5:52 PM0 commentsViews:

rajnath singh on dawood05 मे : गेला दाऊद कुणीकडे ?, या नाट्यावरुन संसदेत आज चांगलाच गोंधळ उडाला. अखेरीस गृहमंत्रालयाने आता सारवासारव करायला सुरुवात केलीय. दाऊद कुठे आहे ते माहीत नाही, गुप्तचर संस्थांना दाऊदची माहिती नसल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी म्हटलं होतं. यावर आता दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्रालयाने दिलंय. सोबतच अशा प्रकारचं उत्तर ज्या अधिकार्‍याने मंत्र्यांना तयार करून दिलं त्यांच्यावर कारवाई करण्याचा गृहमंत्रालयाचा विचार असल्याचंही कळतंय.

आज संसदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी या प्रकरणी माहिती दिली असता सपेशल सरकारने हातच वर केले आहे. दाऊद कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही. गुप्तचर संस्थांच्या रडारवरही दाऊद नाही. दाऊद कुठे आहे जेव्हा कळेल तेव्हा त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू असं स्पष्टीकरणच चौधरी यांनी दिलं. चौधरी यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडालीये. त्यामुळे गृहमंत्रालयाने यावर खुलासा केलाय. दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहित नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्रालयाने दिलंय. सूत्रांच्या माहितीनुसार दाऊद कराचीत असून दुबईला ये-जा करत असल्याची शेवटची माहिती होती. पण त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीशीनंतर त्याने दुबईला जाणं थांबवलं. सूत्रांनी दिलेल्या आणखी काही माहितीनुसार दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची पाकिस्तानची इच्छा नाही. कारण दाऊद भारताला ISIच्या कारवायांविषयीही माहिती देईल अशी पाकिस्तानला भीती आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी काय सांगितलं होतं ?

“दाऊद कुठे आहे, याचा आतापर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. तो कुठे आहे ते कळल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पण घातपाताच्या कारवायांमध्ये वाँटेड असणार्‍या फरार आरोपींविषयी माहिती देण्याची विनंती भारत सरकारने केलेली आहे.”

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close