नवी मुंबईत ‘त्या’ 150 इमारती पाडू देणार नाही- नाईक

May 5, 2015 7:01 PM0 commentsViews:

ganesh naik ncp05 मे : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या गरजेपोटी बांधलेल्या 800 इमारती पैकी 150 इमारती येत्या 8 मे पासून जमिनदोस्त करण्यासाठी पूर्ण तयारी सिडकोने केलीय. पोलिसांची मोठी कुमक ही तयार करण्यात आलीय.

या इमारती कोणत्याही पस्थितीत पाडू देणार नाही याकरीता रस्त्यावर उतरू अशी भूमिका माजी मंत्री गणेश नाईक यांनी घेतलीय.

एवढ्या मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्याच कशा ?, याला सर्वस्वी अधिकारी वर्ग जबाबदार आहे असा आरोपही नाईक यांनी केला. नाईक आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पत्रकारांशी बोलत होते.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close