जीवघेणी वाहतूक कोंडी एकाच्या जीवावर बेतली

May 5, 2015 7:16 PM0 commentsViews:

kalyan news05 मे: वाहतूक कोंडीत अडकल्यावर कधी यातून सुटका होते असं प्रत्येकाला वाटतं पण हीच वाहतूक कोंडी कल्याणमध्ये रमेश मोरे यांच्या जीवावर बेतलीये.

कल्याणमधल्या गौरीपाडा परिसरात राहणार्‍या 68 वर्षांच्या रमेश पांडुरंग मोरे यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना पुढच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं.

वाहतूक कोंडीमुळे त्यांना 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी तब्बल 40 मिनिटं लागली. आणि त्यामुळे त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय.

कल्याणमध्ये सध्या सिमेंटच्या रस्त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खोदकाम झालंय. त्यामुळे कल्याण-मुरबाड या महत्त्वाच्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू आहे. आणि या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होतेय.

पण, प्रशासन किंवा वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करतायत. पण रमेश मोरे यांच्या मृत्यूनंतर आता कल्याणमध्ये संतापाचं वातावरण आहे. तरुणांनी तर याविरोधात ऑनलाईन एक आंदोलनही सुरू केलंय.

  KalyanInfraFracture ह्या नावाने फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट उघडून त्यामध्ये कल्याण मधील समस्यांना वाचा फोडली आहे. #KalyanInfraFracture अश्या प्रकारे हॅशटॅगही वापर करून लोकांनी पण समस्या मांडाव्या असे कल्याण मधील नागरिकांना त्यांनी आव्हान केल आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close