राज ठाकरेंची यशस्वी मध्यस्थी, आता मल्टिप्लेक्समध्ये मराठी ‘टक्का’ वाढला

May 5, 2015 8:43 PM0 commentsViews:

raj meet malti05 मे : मल्टिप्लेक्सचे मालक आणि मराठी चित्रपट निर्मात्यांमध्ये रिव्हेन्यू शेअरिंग बाबत जो वाद सुरू होता,यावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांची बैठक बोलवली यामध्ये दोनही बाजूंचे बोलणे ऐकून सूवर्ण मध्य काढण्यात आला.

या पूर्वी मल्टिप्लेक्स कडून निर्मात्यांना पहिल्या आठवड्यात 45 टक्के, दुसर्‍या आठवड्यात 40 टक्के, तिसर्‍या आठवड्यात 35 आणि
चौथ्या आठवड्यात 30 टक्के उत्पन्न लाभांश मिळायचा. मात्र, आता सिनेमेक्स, बीग सिनेमा,पीव्हीआर आणि सिनेपोलिस या मल्टिप्लेक्स कडून पहिल्या आठवड्यात 45 टक्के, दुसर्‍या आठवड्यात 45 टक्के, तिसर्‍या आठवड्यात 35 टक्के आणि चौथ्या आठवड्यात 30 टक्के उत्पन्न लाभांश निर्मात्यांना मिळेल. सोबतच या चार समुहाच्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचे एकूण उत्पन्न नऊ कोटीच्या वर गेले तर पहिल्या आठवड्याचे जेवढे उत्पन्न असतील त्याच्या अडीच टक्के बोनस म्हणून दिले जातील. या निर्णयाबाबत सर्वच निर्मात्यांनी आनंद व्यक्त केलाय. विशेष म्हणजे अलीकडेच रिलीज झालेल्या टाइमापास-2 सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये देण्यात येणार्‍या उत्पन्न टक्क्यावरून वाद निर्माण झाला होता. हिंदी सिनेमांना पहिल्या आठवड्यात उत्पन्नाच्या 55 टक्के, दाक्षिणात्य सिनेमांना 50 टक्के मिळत असताना मराठी टाइमपास टू ला 45 टक्के का, असा सवाल निर्मात्यांनी उपस्थित केला होता. पण, मल्टिप्लेक्सचालकांनी आपली आठमुठी भूमिका कायम ठेवली होती. अखेर माध्यमांनी मराठी सिनेमासाठी बाजू लावून धरल्यानंतर मल्टिप्लेक्सचालकांनी माघार घेऊन अटी मान्य केल्या होत्या. आता त्यावर कायमचा मधला मार्ग काढण्यात आलाय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close