मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही – विलासराव देशमुख

October 23, 2009 10:45 AM0 commentsViews: 54

23 ऑक्टोबर विलासराव देशमुखांची मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असं विलासराव देशमुख यांनी सोनियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं. विलासरावांनी शुक्रवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. निवडणुकीतल्या यशानंतर आता राज्यात सत्ता स्थापण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची शनिवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठीत नवा नेता निवडण्यात येईल. यासाठी काँग्रेसचे तीन निरिक्षक मुंबईत येणार आहेत. यामध्ये ए.के.ऍण्टोनी, दिग्विजयसिंग आणि रहेमान खान यांचा समावेश असेल.

close