#फैसलासलमानचा : फूटपाथ अपघात प्रकरणी सलमान खान दोषी!

May 6, 2015 12:21 PM1 commentViews:

Hit and run salman

06 मे : अखेर सल्लुमियाँ आता जेलमध्ये जाणार हे आता निश्चित झालंय. 2002 साली बेदकारपणे गाडी चालवून एकाचा बळी घेणार्‍या सलमान खानाला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय. सलमानविरोधात सर्व आरोप सिद्ध झाले असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही सिद्ध झालाय. सलमानला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण, शिक्षा कमी व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद सुरू आहे. शिक्षा कमी करा,जास्तीचा दंड भरण्यास तयार आहोत अशी याचना सलमानने केलीये. तर कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टात अश्रू अनावर झाले. कोर्टातच सलमान रडला. त्याची बहिण अर्पितालाही कोर्टात रडू कोसळलं. कोर्टाने दोषी ठरवल्याचा निर्णयाच्या धक्क्यामुळे सलमानच्या आईची प्रकृती बिघडली त्यामुळे कोर्टातून सलमानचा भाऊ सोहेल खान घरी परतला. मात्र, सरकारी वकिलांनी आपली बाजून लावून धरली असून जास्तीत शिक्षा द्यावी अशी मागणी केलीय. दरम्यान, कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा एकदा सुनावणी होणार असून आजच सलमानला शिक्षा सुनावली जाणार आहे.

आज सकाळपासून काय काय घडलं

– सकाळी 9:45 वा. – सलमान आपल्या वांद्रे बँडस्टँडच्या निवासस्थानाहून मर्सिडीजमधून कोर्टाकडे निघाला
– सकाळी 10:30वा. – सलमानचे कुटुंबीय कोर्टाच्या आवारात पोहोचले
– सकाळी 10:45 वा.- फोर्ट परिसरातल्या सेशन्स कोर्टात पोहोचला सलमान
– 11 वा. – न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे कोर्टात पोहोचले
– 11:10 वा. – देशपांडे यांनी निकाल देण्यास सुरुवात केली. सलमानला दोषी ठरवलं
– 11:15नंतर – शिक्षेबाबत दोन्ही पक्षांचे युक्तिवाद सुरू झाला
– 11:45वा. – सोहेल खान घरी जाण्यासाठी निघाला. सलमानच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे सोहेल गेला घरी. मीडियाच्या गराड्यामुळे सोहेल टॅक्सीनं घरी गेला.
– दुपारी 12:15वा. – युक्तिुवाद संपला. शिक्षेचा कालावधी दुपारी 1:10 वाजता सुनावण्यात येईल, हे घोषित केलं.

सलमानचं फुटपाथ अपघात प्रकरणाचा घटनाक्रम

- 28 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं
- अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी
- सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप
- गेल्या 13 वर्षांपासून हा खटला सुरू आहे
- खटल्यात आतापर्यंत 800 जणांच्या साक्षी नोंदवल्या
- अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत असल्याचा आरोप
- प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सलमानला ओळखलं
- 2012 मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- गेल्या 3 वर्षांमध्ये 28 साक्षीदारांची उलटतपासणी
- सलमानच्या ड्रायव्हरमुळे खटल्याला कलाटणी
- अपघातावेळी गाडी आपण चालवत होतो
- सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहचा कोर्टात दावा
- सलमाननं स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले
- सरकारी पक्षानं सलमानचा दावा फेटाळला
- फुटपाथ अपघात प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
- सलमान विरोधातील आरोप सिद्ध झाल्यास
- त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Jai Maharashtra

    Bas kara tamasha, ajun high court mug supreme court..appeal war appeal..tarik war tarik milnare nusti..Shiksha hos towar Salman swatach daru piun marun jail..

close