सलमान खान फुटपाथ प्रकरणाचा घटनाक्रम

May 5, 2015 10:34 PM0 commentsViews:

salman05 मे : सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणाचा उद्या बुधवारी फैसला होणार आहे. गेल्या 13 वर्षांपासून सुरू असणारा खटल्यानंतर या प्रकरणात सलमान खरचं दोषी आहे का नाही याचा निकाल सेशन कोर्टात लागणार आहे. 28 सप्टेंबर 2002 साली सलमान खानने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात गाडी चालवून फुटपाथवर पाच जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर इतर चौघे जबर जखमी झाले होते. गेली 13 वर्ष या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू होती.

 

फुटपाथ अपघात प्रकरणाचा घटनाक्रम

- 8 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं
- अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी
- सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप
- गेल्या 13 वर्षांपासून हा खटला सुरू आहे
- खटल्यात आतापर्यंत 800 जणांच्या साक्षी नोंदवल्या
- अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत असल्याचा आरोप
- प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सलमानला ओळखलं
- 2012 मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- गेल्या 3 वर्षांमध्ये 28 साक्षीदारांची उलटतपासणी
- सलमानच्या ड्रायव्हरमुळे खटल्याला कलाटणी
- अपघातावेळी गाडी आपण चालवत होतो
- सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहचा कोर्टात दावा
- सलमाननं स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले
- सरकारी पक्षानं सलमानचा दावा फेटाळला
- फुटपाथ अपघात प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
- सलमान विरोधातील आरोप सिद्ध झाल्यास
- त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close