ठाण्यात लोकलवर पाईपलाईन कोसळली : 2 ठार, 12 जखमी

October 23, 2009 10:47 AM0 commentsViews:

23 ऑक्टोबर ठाण्यात लोकलवर पाईपलाईन कोसळून मोठा अपघात झाला आहे. यात जण 2 ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. मोटरमनची केबीन आणि पहिल्या दोन डब्यांवर ही पाईपलाईन कोसळली. लोकल सीएसटीहून कल्याणला निघाली होती. कोपरी इथल्या पुलाजवळ ही घटना घडली. यात पुलाचा काही भागही कोसळला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठाणे ते घाटकोपर दरम्यान पूर्णपणे ठप्प झालीे. आता रेल्वेची ठाणे ते घाटकोपर दरम्यानची वाहतुक सुरळीत होण्यासाठी 30 तासलागतील असं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. या अपघातात पुलाच्या डेब्रिसमुळे दबलेल्या रामचंद्रन या मोटारमनचा मृत्यू झाला. अपघातानंतर तीन तासांनी, गॅस कटरनं डबा कापून रामचंद्रन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तब्बल तीन तास प्रयत्न करूनही रामचंद्रन यांचा जीव वाचू शकला नाही. त्यांचे हात आणि पाय पूर्णपणे अडकल्याने रामचंद्रन यांना काहीही हालचाल करता आली नाही. या अपघातात मृत्यू पावलेल्या मृताच्या नातेवाईकांना रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना 1 लाख तसेच किरकोळ जखमींना 10 हजारांची मदतही देण्यात येणार आहे. तर या घटनेला ठाणे महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

close