सलमान ‘बॅड बॉय’ ते ‘बिईंग ह्युमन’ !

May 5, 2015 11:35 PM0 commentsViews:

05 मे: काळवीट शिकार प्रकरण आणि फूटपाथ अपघात प्रकरणामुळे सलमान खानची इमेज कधीकाळी बॅड बॉय अशी बनली असली तरी आता हा सलमान खान बॉलीवूडमध्ये बिईंग ह्युमन म्हणूनही ओळखला जातो..विशेषतः या काळवीट आणि फूटपाथ अपघाताच्या गुन्ह्यात अडकल्यानंतरच सलमानने आपल्या इमेज मेकओव्हरसाठी विशेष मेहनत घेतल्याचं दिसून येईल. पाहुयात सलमानचा बॅड बॉय ते बिईंग ह्युमनपर्यंतचा प्रवास….

salman_bad_boyसलमान खान….बॉलिवूडचा सुपरस्टार…पण सलमान सुपरस्टार बनला तरी वेगवेगळ्या वादांनी काही त्याचा पिच्छा सोडलेला नाही.
अर्थात प्रारंभीच्या त्याच्या बॅड बाय इमेजला तो स्वतःही तितकाच कारणीभूत आहे. तरीही आज तो बॉक्स ऑफिसवरचं सर्वाधिक खणखणीत नाणं आहे. कारण त्याचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. म्हणूनच आज सलमान पन्नाशीला आलाय तरी त्याचे सिनेमे पडलेही इतरांपेक्षा अधिक गल्ला कमावून जातात.

सलमानची ही लार्जर दॅन लाईफ इमेज काही एका रात्रीतून आलेली नाहीये. याउलट कधीकाळी तो बॉलिवूडचा बॅड बॉय म्हणूनही
ओळखला जायचा….विशेषतः फूटपाथ अपघात प्रकरणानंतर तर सलमानला बर्‍याच टीकेला सामोरं जावं लागलं. मीडियासोबतही त्याचे काहीवेळा तंटे झाले. पण बॅडपॅच नंतर सलमानने जाणिवपूर्वक स्वतःची प्रतिमा बदलली. विविध सामाजिक घटकांना मदत करण्यासाठी त्यानं 2007 साली बिईंग ह्युमन ही स्वयंसेवी संस्थाच स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सलमाने समाजातल्या अनेक गरजू घटकांना मदत केली. याच काळात सलमानच्या बिईंग ह्युमन या टी शर्टची फॅशन भलतीच लोकप्रिय ठरली. विशेषतः ‘दबंग’ आणि ‘किक’ आणि ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशामुळे सलमान पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला.

सलमानच्या इमेज मेकओव्हरमध्ये त्याची नवी मॅनेजर रेश्मा शेट्टी हिचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. सलमानची बहिण अर्पिताचा
शाही विवाह तर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. सलमानने अगदी सख्ख्या बहिणीप्रमाणे अर्पिताचा सांभाळ करत मोठ्‌या धुमधडाक्यात तीचं लग्न लाऊन दिलं. अशा दिलदार वृत्तीमुळेच सलमान पुन्हा एकदा तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला..म्हणूनच फूटपाथ प्रकरणात सलमान आरोपी असूनही त्याची लोकप्रियतेत अजिबात घट झालेली नाही. थोडक्यात कायतर सलमानच्या बाबतीत ‘दिल में आता हूँ समझ में नही…’हा त्याचाच डॉयलॉग तंतोतंत लागू पडतो…

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close