फूटपाथ अपघातप्रकरण: बॉलीवूडचे 200 कोटी पणाला

May 6, 2015 10:27 AM0 commentsViews:

20006 मे : बॉलीवूड अभिनेता सलमान खानवरील फूटपाथ अपघातप्रकरणावर बुधवारी लागणार्‍या निकालात काही भयंकर घडू नये अशी आशा चित्रपट सृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. सलमान खानवर बॉलीवूडचे तब्बल 200 कोटी पणाला लागले आहेत.

गेल्या 13 वर्षांपासून सलमान खान विरोधात सुरू असलेला ‘फूटपाथ अपघात’ प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून आज यावर सत्र न्यायालय आपला अंतिम निकाल सुणावणार आहे. या निकालावर सलमान खानच्या चाहत्यांसोबतचं बॉलीवूडकरांचेही लक्ष लागले आहे.

अभिनेत्री करिना कपूरसोबतचा ‘बजरंगी भाईजान’ आणि सोनम कपूरसोबतचा ‘प्रेम रतन धन पायो’ या सलमानच्या दोन मोठ्या चित्रपटांचं शूटींग सुरू असून ‘दबंग-3′, ‘एण्ट्री मैं नो एण्ट्री’ या चित्रपटांसाठी त्याने करार साईन केला आहे. त्यामुळे फैसला सलमानच्या बाजूनं लागावा यासाठी समस्त बॉलिवूड देव पाण्यात घालून बसले आहे.

दरम्यान, सलमान खान निकालावर सट्टा लावण्यात आल्याची चर्चा आहे. सट्टाबाजारात सलमानच्या शिक्षेवर 2000 कोटींचा सट्टा लागल्याची माहिती समोर आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close