अपघातामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत

October 23, 2009 10:50 AM0 commentsViews: 97

23 ऑक्टोबर ठाण्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेचा फटका आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे. लोकलवर पूल कोसळल्यानं ठाणे-घाटकोपर दरम्यानची वाहतूक 30 तास बंद राहणार आहे. पडलेला पूल दुरुस्त करण्यासाठी ठाणे आणि मुलंड दरम्यानची ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं याबाबतची माहिती दिली आहे. सीएसटी ते घाटकोपर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहील. तसंच ठाणे ते कसारा- कर्जतपर्यंत आणि ठाणे ते वाशीदरम्यान वाहतूक सुरू राहील. या अपघातामुळे अनेक लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

close