…आणि सलमान कोर्टात रडला

May 6, 2015 1:50 PM0 commentsViews:

salman cry06 मे : मुंबईत 2002 साली वांद्र्यात दारू पिऊन बेदकारपणे गाडी चालवून एकाच बळी घेणार्‍या सलमान खानला आपल्या कृत्यावर आता रडू कोसळलंय. मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टातच रडू कोसळलं.

न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी तुझ्याविरुद्धचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. तुझा ड्रायव्हर अशोक सिंग नव्हे, तर तूचं गाडी चालवत होतास. तू दारू पिऊन गाडी चालवत होता. तुला होऊ शकणार्‍या शिक्षेवर काय म्हणणं आहे? असा सवाल केला असता सलमान स्तब्ध झाला आणि रडू लागला.

थोड्यावेळाने स्वत:ला सावरत सलमानने दया याचना करण्यास सुरुवात केली. मी बिंईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून आतापर्यंत मी 42 कोटी या संस्थेच्या कामासाठी दिले आहेत. माझं सामाजिक कार्य पाहून शिक्षा कमी द्यावी अशी याचना केली. एवढंच नाहीतर सलमानच्या वकिलांनी शिक्षा कमी करा वाटलं तर कितीही दंड भरण्यास तयार आहोत असा युक्तीवाद केला. सलमानचा हुद्दा पाहुन शिक्षा देऊ नका, त्याचा गुन्हा पाहुन शिक्षा द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close