मी सामाजिक कार्य केलंय, मला कमी शिक्षा द्या, सलमानची याचना

May 6, 2015 1:29 PM0 commentsViews:

Salman-Khan

06 मे : फुटपाथ अपघात प्रकरणात वांद्रेतील सत्र न्यायालयाने बॉलिवूडच्या दबंग खानला आज (बुधवारी) दोषी ठरवलं. सदोष मनुष्यवधाचा आरोपही पुराव्यांवरून सिद्ध होत असल्याचं न्यायालयानं सांगितलं. या गुन्ह्यात्यंर्गत दोषीला 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. हा आरोप सिद्ध झाल्यामुळे सलमानला आजची रात्र तुरुंगात काढावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने बचाव पक्षाकडून त्यांची बाजू विचारली आहे. त्यावर सलमान खानचे वकीलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांचा सवाल
तुझ्याविरुद्धचे सगळे आरोप सिद्ध झालेत
अशोक सिंग नव्हे, तर तूचं गाडी चावत होतास
तुला होऊ शकणार्‍या शिक्षेवर काय म्हणणं आहे?

मी बींग ह्यूमन ह्या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून आतापर्यत मी 42 कोटी या संस्थेच्या कामासाठी दिले आहेत, सलमानचं प्रत्युत्तर

सलमानच्या वकिलांचा युक्तिवाद
सलमानला केवळ तो अभिनेता असल्यामुळे शिक्षा होऊ नये
हुद्दा काय यावर शिक्षा जाहीर होऊ नये, बचाव पक्षाचं म्हणणं
दंड वाढवा पण 3 वर्षापेक्षा अधिक शिक्षा देऊ नका, बचाव पक्षांचं म्हणणं

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close