तरुणांनी घात केला- सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेबांची टीका

October 23, 2009 1:17 PM0 commentsViews: 2

23 ऑक्टोबर काँग्रेसने ब्रिटिश नीती वापरून मराठी मतं फोडण्याचं काम केलं. अशी टीका दै.सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या पिढीला महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, शिवसेनेचाही नाही, अस सांगत, राज ठाकरेंमागे गेलेल्या तरूणाईलाही दोष देण्यात आला आहे. सेनेचा पराभव हा काँग्रेसनं मराठी माणसांसाठी खोदलेला खड्डा आहे, अशी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. भ्रष्टाचार, महागाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दहशतवादी हल्ला असे अनेक मुद्दे असताना, लोकांनी काँग्रेस आघाडीलाच का पसंती दिली, याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळेच नाकर्त्या सरकारला घालवण्याची संधी महाराष्ट्रानं पुन्हा एकदा घालवली, अशी नैराश्यातून आलेली टीकाही करण्यात आली आहे. पराभवाची फुले जपून ठेवू आणि त्यांच्या ठिणग्या बनवू असा खास सेना स्टाईलचा आशावादही अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

close