युतीसोबत विरोधी बाकावर बसायला तयार – राज ठाकरे

October 23, 2009 2:03 PM0 commentsViews:

23 ऑक्टोबर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षांसोबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही राज ठाकरेंनी आयबाएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. रस्ते, पाणी, वीज या मुख्य गरजांवर लक्ष देण्यावर राज यांनी भर दिला. त्याचबरोबर मनसेचे 13 आमदार सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवतील असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेवर निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे 13 आमदार सध्याच्या राजकीय प्रवाहात वाहून जाणार नाहीत. माझ्या आमदारांना वेडेवाकडं वागू देणार नाही, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी गुरुवारीच मतदारांना दिली होती. निकालांनंतर आयबीएन लोकमतला राज यांनी खास मुलाखत दिली. त्यात राज यांनी विरोधी पक्ष आक्रमक नसल्याची टीका केली आहे.

close