ब्रिटनमध्ये आज मतदान

May 7, 2015 10:51 AM0 commentsViews:

schools-run-mock-elections-instill-british-values-101639212

07 मे : पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टी सत्ता कायम राखणार, की एड मिलिबँड यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टी नवे सत्ताधारी होणार, या प्रश्नाचे उत्तर देणारी सार्वत्रिक निवडणूक आज, गुरुवारी ब्रिटनमध्ये होत आहे. 650 सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समधील बहुमतासाठीचा हा लढा असून, स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल. तर उद्या म्हणजे 8 मेला लगेचच या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

एकूण 650 सदस्य संख्या असलेल्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये 325 जागांचा आकडा गाठणारा पक्ष बहुमत मिळवून सत्तेत येईल. ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या 650 जागांसाठी हे मतदान होतंय. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरही निवडणुका होत आहेत. डेव्हिड कॅमरून यांची कन्झर्व्हेटिव्ह पार्टी 647 जागांवर लढत असून मिलिबँड यांची लेबर पार्टी 631 जागांवर लढतं आहे. लेबर पार्टी 1997 ते 2010 या काळात सत्तेत होती. या पक्षाने सध्याच्या सरकारमध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाशी युती केली होती.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये अनिवासी भारतीयांची भूमिकाही महत्त्वाची मानली जातेय. या निवडणुकीत 6.2 लाखांहून अधिक अनिवासी भारतीय आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याचा विचार करून काही अनिवासी भारतीयांना उमेदवारीही देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close