विधीमंडळ पक्षनेता निवडीबाबत काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु

October 24, 2009 9:32 AM0 commentsViews: 2

24 ऑक्टोबर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी चार वाजता होणार आहे. यासाठी दिल्लीहून काँग्रेसचे निरीक्षक येणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीवर यावेळी चर्चा होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाणही या बैठकीला उपस्थित राहतील. दरम्यान विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांच्याकडून मुख्यमत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत असंल्याचं समजतं. नेता निवडीच्या पार्श्वभूमीवर विलासरावांच्या मुंबईतल्या घरी मोठी वर्दळ सुरू झाली आहे. अनेक आमदार आणि खासदार विलासरावांची भेट घेत आहेत.

close