राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

May 7, 2015 2:55 PM0 commentsViews:

salman and raj banner07 मे :फुटपाथ अपघात प्रकरणातील दोषी अभिनेता सलमान खानच्या भेटीसाठी अवघं बॉलिवूड वांद्र्यातील त्याच्या घरी एकवटलंय. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पाऊलही वांद्र्यातील ‘गॅलेक्सी’कडे वळल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आज (गुरुवारी) सकाळी राज ठाकरे यांनी सलमानच्या घरी अर्थात गॅलेक्सी ‘अपार्टमेंट’वर जाऊन सलमानची भेट घेतली. तासभरही भेट चालली त्यानंतर राज आपल्या निवास्थानी परतले.

सलमान खानला बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने फुटपाथ अपघात प्रकरणात दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पण काही तासांतच मुंबई हायकोर्टाने त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यामुळे सलमान संध्याकाळी आपल्या घरी परतला. सलमानचं सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी सेलिब्रिटींची रिघ लागलीय. आज सकाळी आमिर खाननेसुद्धा सलमानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी सलमान खानची घरी भेट घेतल्यामुळे एन नवा वाद निर्माण झालाय. राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे एका दोषीला भेटणं योग्य आहे का ? असा सवाल आता विचारला जातोय. राज ठाकरे यांचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांशी चांगले संबंध आहे. सलमानचे वडील सलीम खान यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचा राज ठाकरे यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात उल्लेख केला आहे. एवढेच नाहीतर मनसेच्या कोळी मेळाव्यातही सलमानने हजेरी लावली होती. तसंच मुंबईच्या विकास आराखड्याबाबतच्या कार्यक्रमात सलमान उपस्थित होता. विशेष म्हणजे, संजय दत्तला शिक्षा झाली होती तेव्हा सुद्धा राज यांनी संजूबाबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

 सेलिब्रिटींना पुळका

गेल्या दोन दिवसांमध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानसह अनेक बड्या तारे-तारकांनी सलमान खानची भेट घेतली. शाहरूखने मंगळवारी मध्यरात्रीनंतर सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. तर काल बुधवारी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सलमान खान जेव्हा घरी आला तेव्हा राणी मुखर्जी, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बसू, सुनील शेट्टी, चंकी पांडे असं अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सलमानला भेटायला आले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close