राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक सोमवारी

October 24, 2009 9:38 AM0 commentsViews: 1

24ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, गोविंदराव आदीक आणि डी. पी. त्रिपाठी हे चार केंद्रीय निरिक्षक मुंबईत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता अजित पवार उतरल्याची चर्चा राजकारणात आहे. संपूर्ण राज्यात साधारणत 25 बंडखोर निवडून आलेत. त्यापैकी 13 बंडखोर फक्त राष्ट्रवादीचेच आहेत. विशेष म्हणजे हे सगळे बंडखोर अजित पवारांचे समर्थक आहेत. त्यामुळे बंडखोरांचं हे संख्याबळ आपल्याकडे ओढून अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. आत्तापर्यंत छगन भुजबळ, आर. आर. पाटील, आणि जयंत पाटील हे तीनच नावं उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होती. पण आयबीएन-लोकमतला विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता अजित पवारांचंही नाव राष्ट्रवादीच्या वर्तुळात जोरदारपणे घेतलं जात आहे.काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लाँबिंग सुरू आहे, तर राष्ट्रवादीमध्येही उपमुख्यमंत्रीपद आणि चांगल खातं मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

close