राहुल गांधींची ट्विटरवर एंट्री, तासाभरात हजारो फॉलोअर्सची गर्दी

May 7, 2015 4:03 PM0 commentsViews:

office of rg07 मे : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ट्विटरवर आले आहेत. ‘ऑफिस ऑफ आरजी’ या नावाने राहुल गांधी यांनी ट्विटरवर अकाऊंट उघडले आहे. राहुल यांनी अकाऊंट उघडताच अवघ्या काही तासांमध्ये त्यांचे 32 हजार फॅन फॉलोअर्स झालेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यावर, राहुल ट्विटरवर का नाहीत, त्यांना तरुणांशी संवाद साधायचा नाही का ?, अशी टीका झाली होती. आज जिल्हा स्तरावरचे नेतेही फेसबुक आणि ट्विटरवर असताना, राहुल गांधीच कसे काय नाहीत, हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण अखेरीस राहुल यांनी उशिरा का होईना ट्विटरवर एंट्री मारलीये. त्यांच्या या हँडलवर ते आपली भाषणं, अधिकृत दौरे आणि इतर कार्यक्रमांची माहिती देणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close