छट पुजेच्या उत्सवाला कल्याणमध्ये गालबोट

October 24, 2009 9:41 AM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबरशनिवारी साजर्‍या होणार्‍या छटपुजेच्या उत्सवाला कल्याणमध्ये गालबोट लागलं. छटपुजेसाठी आलेल्या 2 युवकांचा इथल्या उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला. हे दोघेही युवक शहाडमधले राहणारे आहेत. उत्तर भारतीयांचा मोठा सण छटपूजा शनिवारी साजरी होत आहे. मंुबईतही उत्तर भारतीय हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या वर्षी मनसेनं त्याला विरोध केला होता. त्यामुळे मंुबईत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. छटपूजेदिवशी उगवत्या सूर्याची पूजा केली जाते. समुद्राच्या किनार्‍यावर हा सण साजरा केला जातो. त्यामुळे मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर उत्तर भारतीयांची सकाळी मोठी गर्दी झाली होती. गेल्या वर्षी मनसेच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे वर्सोवा, जुहू बीच आणि इतर ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

close