रेल्वे अपघात प्रकरणी पुलाच्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

October 24, 2009 10:12 AM0 commentsViews: 82

24 ऑक्टोबर ठाणे इथं झालेल्या रेल्वे अपघातातील दोषी कॉन्ट्रॅक्टरवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय पाल मंगल ऍण्ड कंपनी या पुलाचं बांधकाम करत होती. त्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अजून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अपघातात मृत्यू पडलेल्या मोटरमनच्या नातेवाईकांना 15 लाखांची मदत देण्याची घोषणा रेल्वेनं केली आहे. मोटरमनच्या केबीनवरच पुलाचा भाग कोसळला होता. त्यानंतर पाईपलाईनही कोसळली त्यामध्ये मोटरमन आर. रामचंद्र यांना काल जीव गमवावा लागला. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. या 15 लाखांच्या मदतीसोबतच रामचंद्रन यांच्या पत्नीला रेल्वेत नोकरी देण्याची घोषणा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

close