ठाण्यात दिवसाढवळ्या नवविवाहितेची गळा चिरून निर्घृण हत्या

May 7, 2015 8:16 PM0 commentsViews:

thane_murder07 मे : ठाण्यात दिवसाढवळ्या एका 24 वर्षांच्या नवविवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात  खळबळ उडाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालंय. प्रियांका प्रमोद खराडे असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2च्या सुमाराला पासपोर्ट ऑफिसच्या मागच्या रस्त्यावर फुटपाथवर घडली.

प्रियांका ठाण्यात किसननगर या भागात आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. प्रियांका ज्ञानसाधना महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. आठच दिवसांपूर्वी तिचा विवाह कल्याण इथल्या प्रमोद खराडे यांच्याशी झाला होता. तिच्या हत्येचे कारण समजू शकलेलं नाही. मात्र ही हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. स्थानिकांची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून वागळे इस्टेट पोलीस पुढचा तपास करत आहेत.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close