मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाणांचं नाव आघाडीवर

October 24, 2009 10:46 AM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. नेतेपदाच्या निवडीसाठी मंुबईत बैठक सुरू आहे. याच वेळी 16 अपक्ष आमदारांनी अशोक चव्हाणांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी केंद्रीय निरीक्षकांना पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. बैठकीसाठी दिल्लीहून काँग्रेसचे निरीक्षक दाखल झालेत. या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांनाही निमंत्रण देण्यात आलं. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाणही या बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांच्याकडूनही मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.

close