मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय सोनिया घेणार – ए.के.अँटोनी

October 24, 2009 1:42 PM0 commentsViews: 9

24 ऑक्टोबर काँग्रेसपक्षाच्या विधिमंडळाच्या नेता सोनिया गांधींच ठरवतील असं केंदि्रय निरीक्षक ए.के. अँटोनी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसपक्षाच्या नेता निवडीसाठी मुंबईच्या विधानभवनात बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या 82 आमदारांशी निरीक्षक मंडळाने चर्चा केली आणि त्यांची मत जाणून घेतली. आयबीएन-लोकमतला विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांना 80 टक्के आमदारांनी पाठींबा दिला आहे.आमदारांच्या मतांचा अहवाल लवकरच काँग्रेस अध्यक्षांना सादर करणार असल्याचंही अँटोनी यांनी सागितलं. अँटोनी यांच्यासोबच विलासराव देशमुख आणि नारायण राणे हे नेतेदेखील दिल्लीला रवाना झाले आहेत.

close