सलमान खानच्या फुटपाथ अपघात प्रकरणाचा घटनाक्रम

May 8, 2015 9:41 AM0 commentsViews:

salman

08 मे : फुटपाथ अपघात प्रकरणात बुधवारी सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, याच दिवशी संध्याकाळी हायकोर्टाने त्याला दोन दिवसांचा जामीन मंजूर केला. सेशन्स कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत सलमानला न मिळाल्यानं त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला होता. सलमान खानला मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपतं आहे. त्या अर्जावर आज हायकोर्टात न्यायमूर्ती ठिपसे यांच्यापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. या खटल्याचा प्रवास कसा झाला, काय घटना होती आणि हा खटला न्यायालयात कशा पद्धतीने चालला याचा सविस्तर घटनाक्रम

फुटपाथ अपघात प्रकरणाचा घटनाक्रम

– 28 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं
– अपघातात एकाचा मृत्यू
– सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप
– गेल्या 13 वर्षांपासून हा खटला सुरू आहे
– खटल्यात आतापर्यंत 800 जणांच्या साक्षी नोंदवल्या
– अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत असल्याचा आरोप
– प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सलमानला ओळखलं
– 2012 मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
– गेल्या 3 वर्षांमध्ये 28 साक्षीदारांची उलटतपासणी
– सलमानच्या ड्रायव्हरमुळे खटल्याला कलाटणी
– अपघातावेळी गाडी आपण चालवत होतो
– सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहचा कोर्टात दावा
– सलमाननं स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले
– सरकारी पक्षानं सलमानचा दावा फेटाळला
– फुटपाथ अपघात प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
– सरकारी पक्षाचा युक्तिवाद
– सलमानच्या वकिलांचा युक्तिवाद
– दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला
– न्यायालयाने निकालाची तारीख 6 मे निश्चित केली
– न्यायालयाने निकाल सुनावला, सलमान दोषी. सायंकाळी हायकोर्टाकडून दोन दिवसांचा जामीन

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close