कॉँग्रेसमधील नव्या चेहर्‍यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

October 26, 2009 8:50 AM0 commentsViews: 13

26 ऑक्टोबरमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापुढे आता मंत्रीमंडळ स्थापन करण्याचं आव्हान आहे, पक्षश्रेष्ठींबरोबर विचारविनीमय सुरु आहे. वर्षा गायकवाड, निर्मला गावित, पद्माकर वळवी, सतेज पाटील, अब्दुल सत्तार, राजीव सातव बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, रामप्रसाद बोर्डीकर यापैकी अनेकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय कालीदास कोलंबकर विनायक निमण, आणि माणिकराव कोकाटे या नारायण राणेंच्या समर्थकांपैकी दोघांची वर्णी लागु शकते. तर राजेंद्र दर्डा शिवाजीराव मोघे, नितीन राऊत आणि कृपाशंकर सिंग यांचीही नावे कॅबीनेट पदासाठी चर्चेत आहेत. मावळत्या मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या नेत्यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल यात शंका नाही. कोणत्याही दिग्गज नेत्याच्या वारसदाराला मंत्रीमंडळात स्थान देऊ नये असं मतप्रवाह असला तरी रावसाहेब शेखावत यांचा मंत्रीमंडळात समावेश होऊ शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचीसुध्दा कॅबिनेट मंत्री बनण्याची इच्छा आहे. पण त्याबदल्यात प्रदेशाध्यक्षपद सोडायला मात्र ते तयार नाहीत. एकंदरित मंत्रीमंडळात नव्या चेह-यांना संधी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय.

close