सलमान सुटला, पण कोर्टात काय घडलं ?

May 8, 2015 4:44 PM0 commentsViews:

salman_highcourt3308 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली असून 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर केलाय. मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आज सलमानला जेल होणार की बेल याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं नेमकं कोर्टात काय घडलं…

 सलमानच्या जामिनावर वाद-प्रतिवाद

सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद
- अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते
- अपघातचं ठिकाण आणि हॉटेल मॅरियट हे 7 ते 8 किमीच्या अंतरावर आहे
- तिथे पाहोचायला त्यांना अर्धा तास लागला असेल तर मग गाडीचा वेग 90 प्रति किमी कसा ?, तो 40 असायला हवा..!!
- साक्षीदार रवींद्र पाटील यांची 2002 मध्ये एका वृत्तपत्रात आलेली मुलाखत ग्राह्य का धरली जात नाही
- त्या मुलाखतीत पाटील याने गाडी अल्ताफ चालवत होता असं म्हटलं होतं.

सरकारी वकिलांचं उत्तर

- कमाल खानच्या साक्षीचा मुद्दा सेशन्स कोर्टात नव्हता
- हा मुद्दा हायकोर्टात मुद्दाम आणला गेलाय
- सरकारी वकिलांचा सलमानच्या शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध
- रविंद्र पाटील यांनीही गाडीत तीनच लोक असल्याचं सांगितलं होतं
- कमाल खानचा जबाब आधी नोंदवला होता
- पण नंतर त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारल्यानं ते जबाब नोंदवण्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत

कोर्टाने सलमानच्या वकिलांना सुनावले
- कोर्टाची दिशाभूल करू नका
- निकालाची प्रत मिळाली की नाही ते आधी सांगा
- अंतरिम जामीनासाठी जे कारण दिलं होतं त्याचं काय झालं
- न्यायाधीशांनी सलमानच्या वकिलांना केला प्रश्न

न्यायाधीशांचं मत

- सलमानच्या खटल्यावर स्थगिती मिळायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे -न्यायाधीश
- याचिका प्रलंबित असताना याचिकाकर्त्यानं का सहन करावं -न्यायाधीश
- याचिकाकर्त्याचा हक्क अबाधित राहावा -न्यायाधीश

सलमानला सशर्त अटी

- 30 हजार रुपयाचा बाँड भरावा लागेल
- पासपोर्ट कोर्टाकडे जमा करावा लागेल
- देशाबाहेर प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागेल
-सलमानने यापुर्वीच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट जमा केलेला आहे
- हायकोर्ट 15 जूनला या प्रकरणात पुढचे दिशानिर्देश देईल
- जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या प्रकरणी सुनावणी सुरू होईल

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close