सामनात पत्रकारांवर जहरी टीका

October 26, 2009 9:04 AM0 commentsViews: 26

26 ऑक्टोबरसोमवारच्या सामनामधून बाळासाहेबांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पण त्याचबरोबर पत्रकारांवरुन जहरी टिका केलीय. मराठी माणसानेच शिवसेनेला दगा दिला, खंजीर खुपसला असा घणाघाती आरोप करणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज थोडी नरमाईची भूमिका घेतलीये.सामनामधून काल सर्व मराठी माणसांवरटीका केली होती. यावरसर्वच स्तरातून टीका झाली होती. पण सर्वच मराठी माणसांनी नाही तर काही लोकंानीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय असं स्पष्टीकरण आज सामनात लिहीलेल्या अग्रलेखातून देण्यात आलंय. दुबे,चौबे, खान, ढोलकीया यांनी नाही, तर देशपांडे, चव्हाण, भुजबळ, राणे व आमच्या घरातले ठाकरे हे खंजीर खुपसणारे मराठी नव्हते का असाही सवाल करण्यात आलाय. विधानसभेतल्या पराभवानंतर माध्यमांनी केलेल्या टीकेवरही बाळासाहेबांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

close