…नाहीतर सरकारविरोधात आंदोलन करू, सेनेचा भाजपला इशारा

May 8, 2015 7:03 PM0 commentsViews:

anil desai08 मे : शिवसेनेनं केंद्र सरकारबाबत पुन्हा एकदा निर्वणीची भूमिका घेतलीय. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मदत द्या, नाहीतर शिवसेना सरकारमध्ये असूनही सरकारच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिला.

आज राज्यसभेत अवकाळीमुळे राज्यात पिकांचं किती नुकसान झालं आणि राज्य सरकारनं केंद्राकडे किती मदत मागितली, असा प्रश्न शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केला. याला उत्तर देताना 2 लाख 46 हजार 256 हेक्टर जमिनीवर विविध पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारनं पाठवलाय, असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलंय. पण, नेमकी आकडेवारी महाराष्ट्र सरकारनं दिलेली नाही, असं स्पष्टीकरणही राधामोहन सिंह यांनी दिलं. यावरून अनिल देसाई यांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय. शेतकर्‍यांना मदत द्या, नाहीतर शिवसेना सरकारमध्ये असूनही सरकारच्या विरोधात आंदोलन करेल असं अनिल देसाईंनी ठणकावलं. तसंच मदत देण्यात सरकारी यंत्रणा ढिसाळपणा करतेय, नुकसानाची पाहणीही त्या पथकानं रात्रीची वेळ निवडली होती, अशी टीका अनिल देसाईंनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close