‘माता न तू वैरणी’, आईने पोटच्या मुलाची केली हत्या

May 8, 2015 7:31 PM0 commentsViews:

gondiya08 मे : आईनं आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियाच्या मारारटोली परिसरात घडलाय. पिंकू आलम या महिलेनं स्वत:च्या 8 वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्रानं हत्या केली. मुलाच्या हत्येनंतर या महिलेनं स्वत:सुद्धा विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गावकर्‍यांनी मोठ्‌या प्रयत्नांनी या महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं.

मारारटोली परिसरात राहणार्‍या पिंकू आलम या महिलेनं आपला 8 वर्षांचा मुलगा झोपेत असताना त्याची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वता:च्याही गाळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घराशेजारीच असलेल्या विहिरीत उडी मारून स्वता:लाही संपविण्याचा प्रत्यत केला. पण शेजारी राहणार्‍या लोकांना विहिरीत काही पडल्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता सदरील महिला विहिरीत पडल्याची आढळून आली. शेजार्‍यांनी मोठ्या प्रयत्नानंतर या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिंकू आलम या महिलेचे पती हे गोंदिया एसटी महामंडळात वाहकपदावर कार्यरत आहे. पती घरी नसताना महिलेने मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले.मात्र, हत्या नेमक्या कुठल्या कारणावरून केली हे मात्र उद्यापही कळू शकलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close