ज्येष्ठ कवी ना.धों.महानोरांच्या घरावर अज्ञात लोकांचा हल्ला

May 8, 2015 9:09 PM0 commentsViews:

na dho mhanoar308 मे : ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांच्या पळसखेडा येथील घरी अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. महानोर घरी नसतांना अज्ञात लोकांनी घरात घुसून वस्तूंची नासधूस केली असून पुरस्कारांची मोडतोड केलीये. विशेष म्हणजे घरातून कोणत्याही वस्तूची चोरी झालेली नाहीये अशी माहिती महानोर यांनी दिली. या प्रकरणी अजून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर एका लग्ननिमित्ताने जळगावला गेले असता पळसखेडा येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. महानोर यांच्या घराचे दार तोडून हल्लेखोरांनी वस्तूंची नासधूस केली. एवढंच नाहीतर महानोर यांना मिळलेल्या पुरस्कारांची मोडतोड करण्यात आलीये. ही घटना गुरुवारी संध्याकाळी उजेडात आली. आयबीएन लोकमतने महानोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. हल्लेखोरांनी घरात एक रुपयाची चोरी केली नाही. पण, वस्तू, पुरस्कारांनी मोडतोड केलीये. या अगोदरही मला धमकीचे पत्र मिळाले होते. एवढंच नाहीतर अलीकडेच काही अज्ञात लोकांनी फोन करून दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतरही तुम्ही लिखान करत आहात. बोलत आहात. जरा सांभाळून राहा अशी धमकी दिली होती. याबद्दल औरंगाबाद, सोयेगाव पोलिसांना भेटून घडलेल्या घटनेबद्दल माहितीही दिली होती त्यांनी सुरक्षेसाठी पोलीसही पाठवले होते असं महानोर यांनी सांगितलं होतं. आणि आता हा प्रकार घडला. सुदैवाने आम्ही घरी नव्हतो. माझा कुणावर संशय नाही आणि कुणाविरोधात तक्रारही दाखल करायची नाही असंही महानोर यांनी सांगितलं.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close