संधी हुकली पण हार नाही – उद्धव ठाकरे

October 26, 2009 9:40 AM0 commentsViews: 4

26 ऑक्टोबरही शिवसेनेची हार नाही, आम्ही जनतेसाठी लढलो होतो, त्यामुळे अपयशाचा धनी कोण हा प्रश्नच गैरलागू असल्याचं सांगून सेनेच्या पराभवाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनभवनात पत्रकार परिषद घेऊन, निवडणूक निकालांनंतरच्या 100 तासांनंतर उद्धवनी त्यांचं मौन सोडलं. हे निकाल अनपेक्षित असले तरी आमदारांची नवीन फौज घेऊन पुन्हा मैदानात उतरणार असल्याचंही उद्धव यांनी सांगितलय. शिवाय यापुढे हिंदुत्त्वाचा मुद्दा गरज पडल्यास वापरणार आणि संघटनेंतर्गत बदल करण्याचे संकेतही उद्धव यांनी दिलेयत. अपेक्षित यश मिळालं नसल्याची कबुली देत आपल्याला पराभव अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. गरज पडल्यास हिंदुत्वाचा आधार घेणार असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला विधानसभेत 44 जागा मिळाल्या. गेल्या विधानसभा निवडणूकीत 63 जाग्या मिळाल्या होत्या. यंदा भाजपपेक्षाही शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर शिवसेनेची ही पहिली पत्रकार परिषद होती. याचवेळी अशोक चव्हाणांचं अभिनंदन करतानाच, त्यांनी सेनेच्या गटनेतेपदी सुभाष देसाई यांची निवड झाल्याचंही जाहीर केलं. तसंच गेल्या तीन दिवसातील सामनाच्या अग्रलेखांचंही त्यांनी समर्थन केलं. युतीत कुठलेही वाद नाहीत, आता भाजपबरोबर चर्चा करून विरोधी पक्षनेतेपद ठरवू असही त्यांनी म्हटलंय. रामदास कदम यांच्या प्रचाराला का गेला नाहीत असा प्रश्न विचारणा-या पत्रकाराला त्यांनी दमदाटी करुन गप्प बसवलं.

close