माओवादीग्रस्त भागात पंतप्रधानांनी घेतली मुलांची शाळा

May 9, 2015 1:24 PM0 commentsViews:

pm in dantwadi09 मे : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या रेड कॉरीडॉरमध्ये म्हणजे बस्तरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. पंतप्रधानांच्या त्यांच्या दौर्‍यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला. पण माओवाद्यांनी कुणालाही ओलीस धरलं नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. दंतेवाडा इथं पंतप्रधान मोदी यांनी शाळेतल्या विद्यर्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यावेळी एका विद्यार्थीनीनं जर तुम्ही पंतप्रधान नसता तर काय असता अशा प्रश्न विचारला मोदी म्हणाले, आयुष्यचा खरा आनंद हा लहान मुलगा राहण्यात आहे. जे देवाने मला विचारले असत तर मी त्यांना मला लहानपण द्या असं म्हटलं असतं.

दरम्यान, माओवाद्यांनी पंतप्रधानाच्या दौर्‍याला विरोध केलाय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणानी कडक सुरक्षा तैनात केलीय. पंतप्रधानाच्या दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर माओवाद्यांनी कोटमी पोलीस मदत केंद्राला लक्ष्य करण्यासाठी योजना आखली होती. पण पोलिसांनी ही योजना हाणून पाडली. शुक्रवारी झालेल्या चकमकीत दोन माओवादी जखमी झालेत. संपूर्ण बस्तरसह गडचिरोली जिल्हा आणि तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट घोषित करण्यात आलाय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close