सचिनचा असाही ‘कार’नामा, सचिनने बनवलेली कार मिळेल तुम्हाला !

May 9, 2015 2:10 PM0 commentsViews:

अमित मोडक, चेन्नई

09 मे : कार क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या बीएमडब्ल्यूनं मेक इन इंडियाचा नारा दिलाय. या कारसाठी लागणारे 50 टक्के सुटे भाग भारतातचं तयार करण्यात येणार आहे. तसंच भारताल्या प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारीही भारतीय आहे. आणि त्यांचा ब्रँड ऍम्बेसिडर आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर…

sachin bmwसचिन तेंडुलकरला आपण 24 वर्षं फटकेबाजी करतांना बघितलंय. पण चेन्नईमध्ये वेगळाचं सचिनं बघायला मिळाला बॅटिंगऐवजी इंजिन बसवणार सचिन…बीएमडब्लूच्या चेन्नईमधल्या प्लँटमध्ये सचिनने बीएमडब्लू 5 व्या सीरीजच्या गाडीचं इंजिन बसवलंय. पण हे सुरू असतांनाचं सचिनची फिरकी घेण्याचा प्रयत्न झाला.

सचिन तेंडुलकरला वेग आणि कारचं असलेलं वेड सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो फक्त गाडी चालवणं नव्हे तर त्या गाडीबाबत संपूर्ण माहितीही ठेवतो आणि म्हणूनचं त्यानं हे इंजिन बसवण्याचं आव्हानही स्वीकारलं.

सचिननं स्वत: कार असेंबल केली म्हटलं मग कंपनीही या कार सचिन एडिशन कार म्हणून बाजारात आणण्याची तयारी केलीये. सचिन असेंबल केलेली गाडी म्हटल्यावर चाहते किंमत बघणार नाही हे आलंच…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close