दिव्याखाली अंधार, धरणग्रस्तांची हंडाभर पाण्याची 5 किमीची पायपीट !

May 9, 2015 2:23 PM0 commentsViews:

गोपाल मोटघरे, पुणे

09 मे : महाराष्ट्रातलं पहिलं धरण म्हणजे पुण्याजवळचं पानशेत धरण…पण, या धरणासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही. 55 वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहण्याची त्यांच्यावर वेळ आलीय.

panshet pkgधरण बांधण्यासाठी जमीन देणार्‍या पानशेतच्या धरणग्रस्तांना आता पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढावलीये. पानशेत धरणाच्या काठावर राहणार्‍या महिलांना हंडाभर पाण्यासाठी जिवघेणी कसरत करावी लागते. सकाळ होताच टेकपोवळे गावातल्या सर्व महिला पाण्याचा हंडा घेऊन तयार होतात आणि सुरू होते पायपीट. एक हंडा पाणी आणण्यासाठी या महिला दररोज डोंगर उतरून आणि चढून जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास करतात. वाटेत दगड-धोंडे, साप-विंचू आणि अन्य वन्यजीवाची भीती आलीच. धरणाला जमीन दिल्यामुळे आमच्यावर ही परिस्थितीत ओढावल्याचं महिलांचं म्हणणं आहे.

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणासाठी टेकपोवळे, माणगाव, कसेडी, चादर नेवगेवाडी, आणि घोल या गावातल्या
शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी सरकारने घेतल्या. पण,आता या गावांची लोकसंख्या कमी असल्याचं कारण देत पाणी पुरवठा करता येणार नाही अस इथले लोकप्रतिनिधी सांगतात.

सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही, त्यामुळे सरकारने आम्हाला फसवलं, असा या धरणग्रस्तांचा आरोप आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close