सत्तेत वाटा द्या नाहीतर…, घटकपक्षांचा पुन्हा इशारा

May 9, 2015 3:24 PM0 commentsViews:

raju shetty ramdas athavale jankar09 मे : महायुतीच्या चारही घटक पक्षांनी पुन्हा एकदा महायुतीला निर्वाणीचा इशारा दिलाय. सत्तेत दहा टक्के वाटा मिळायला हवा अशी मागणी घटकपक्षांनी महायुती सरकारकडे केली आहे. जर सत्तेत वाटा दिला नाहीतर वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय.

आज महायुतीचे घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे नेते रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची बैठक झाली. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केलीये. ऊस, कापूस, दूध, धान्य उत्पादकांना भाव नाही. जनतेला काय सांगायचं. गोपीनाथ मुंडेंवर विश्वास ठेऊन आम्ही महायुतीत आलो. पण आताचं सरकार पाहता मुंडे नाहीत याची जाणीव होते अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. भाजपने आम्हाला दिलेली कुठली आश्वासनं पूर्ण झाली हे एकदा जाहीर करावं असं आव्हानही शेट्टी यांनी दिलं. तर सरकारमध्ये असून काहीच कामं होत नाहीयेत असं रामदास आठवले म्हणाले. विशेष म्हणजे, महायुतीच्या या तिन्ही घटक पक्षांनी वेळोवेळी भाजपला इशारा दिला. एवढंच नाहीतर राजू शेट्टी यांनी ऊसदरवाढीसाठी सरकारविरोधात आंदोलन केलं. आता पुन्हा एकदा घटकपक्षांनी इशारा दिलाय त्यामुळे भाजप याचा कसा विचार करतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close