सलमानच्या निकालाची प्रत टाईप करताना लाईट कशी गेली?

May 9, 2015 5:42 PM0 commentsViews:

ghrat on salman09 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी सलमान खानच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिलीये.पण, मुंबई सत्र न्यायालयात सलमानला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि जेव्हा त्याला निकालाची प्रत देण्याची वेळ आली होती तेव्हा अचानक लाईट गेली होती. त्यामुळे निकालाची प्रत टाईप होऊ शकली नाही. हेच कारण देऊन सलमानला अंतरिम जामीन मिळाला. पण, नेमकं त्याच वेळी लाईट कशी गेली असा संशय सरकारी वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केलाय. प्रदीप घरत यांनी आयबीएन लोकमतकडे याबद्दल तपशीलवर खुलासा केला असून जर यामागे कुटकारस्थान असेल तर याची चौकशी होईल असं सांगितलंय. या प्रकरणात कोर्टालाच दोषी ठरवलं जात आहे अशी खंतही घरत यांनी व्यक्त केली.

फुटपाथ अपघात प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश देशपांडे यांनी 11 वाजता कोर्टात हजर झाले आणि त्यांनी आरोपी सलमानच नाव पुकारलं आणि सलमान कोर्टात हजर झाला. न्यायाधीशांनी सलमानला सर्व गुन्ह्याखाली दोषी ठरवतो असं सांगितलं. शिक्षा सुनावल्यानंतर दोन्ही पक्षाची बाजू न्यायधीश देशपांडे यांनी ऐकून घेतली. सलमानच्या वकिलांनी शिक्षा का दिली जाते यावर जवळपास तासभर युक्तीवाद केला. कोर्टाने समज देऊनही वकिलांनी युक्तीवाद सुरूच ठेवला होता. अखेरीस शिक्षा सुनावण्याची वेळ जेव्हा ठरवण्यात आली होती. त्या दरम्यान, लाईट गेली. लाईट गेल्यामुळे सलमानाला जी शिक्षा सुनावण्यात आली त्याची प्रत देता आली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला. आजपर्यंत मी याच कोर्टात काम केलंय. पण, क्वचितच लाईट गेली. जरी लाईट गेली तर ताबडतोब येते.पण, त्या दिवशी असं घडलं नाही. त्यामुळे संशयाला जागा निर्माण होत आहे. जर हा घातपाताचा प्रकार असेल तर याची नक्की चौकशी होईल असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. तसंच

घरत पुढे म्हणता, 13 वर्षांपूर्वी जी घटना घडली. तेव्हा साक्ष घेण्याबाबत थोडफार इकड तिकडं होणं हे साहजिक आहे. कमाल खानला का तपासला नाही असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. कोणतीही कमेंट देण्याअगोदर कुणी तपासलं नाही. ज्या दिवशी ही अपघात घडला तेव्हा कमाल खान हा गाडीतून उडीमारून पळू गेला होता. चार पाच दिवसांनंतर त्याला वर्सोव्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं. सलमान गाडी चालवत होता. गाडीत तीन माणसं होती असं त्याने कबूल केलं होतं. आणि ती जबानी दिल्यानंतर तो जो गायब झाला तो आजपर्यंत सापडला नाही. आणि या मागची पार्श्वभूमी अशी की ,तो ब्रिटीश नागरीक आहे. तो इंग्लंडला पळून गेला अशी माहिती पोलिसांना मिळालीये. त्याला परत आणण्याची कोणतीही योजना आपल्याकडे नाही. हा साक्षीदार इतका महत्वाचा आहे का ?, जो इतर साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्यानंतरही त्याला इंग्लंडवरून इथं आणावं ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कमाल खान याची साक्ष का नोंदवली गेली नाही असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला होता. आणि हाच मुद्दा सलमानच्या वकिलांनी लावून धरला होता. त्यामुळे घरत यांनी सलमानच्या वकिलांना हा सवाल विचारलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close