काँग्रेसला 99 चा फॉर्म्युला अमान्य

October 27, 2009 9:06 AM0 commentsViews: 4

27 ऑक्टोबर काँग्रेस-राष्ट्रवादीत आता मंत्रिमंडळवाटपावरुन, रस्सीखेच सुरु झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. 99 चा फॉर्न्युला मान्य नसल्याचं, हुसेन दलवाई यांनी सांगितलं आहे. तसेच काँग्रेसने गृह, ऊ र्जा आणि ग्रामविकास खात्याची मागणी केलीे आहे. हुसेन दलवाई यांनी मंगळवारी दिल्लीत ही मागणी केली. दरम्यान, 99 चाच फॉमुल्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. काँग्रेसला वन-पर्यावरण आणि कामगार मंत्रालय देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली. पण मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात काँग्रेसने ही खाती राष्ट्रवादीला दिली होती. आता जागावाटपाबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वात मोठा पेच आहे. तो मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला, राष्ट्रवादीला किती मंत्रीपद सोडायची. कुठलीही खाती सोडायची याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. हा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत. ते मंगळवारी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. काँग्रेसचे अनेक आमदार सध्या दिल्लीत डेरेदाखल झाले असून मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

close