सर्वसामान्यांना वीमा कवच,पंतप्रधानांच्या हस्ते 3 योजनांचा शुभारंभ

May 9, 2015 10:23 PM0 commentsViews:

pm lic09 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) महत्त्वाकांक्षी अशा तीन योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय. अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती वीमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनेचं उद्घाटन करण्यात आलंय. पंतप्रधानांनी कोलकात्यात या योजनेचं उद्घाटन केलंय. देशातील नागरीकांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. कोलकात्यात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या उपस्थित होत्या.तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात या योजनेचं उद्घाटन केलंय.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत 60 वर्ष वयानंतर लाभार्थीला दरमहा 1000 ते 5000 पेन्शन मिळतील. लाभार्थी आपल्या खात्यात किती हप्ता जमा करतो यावर पेन्शनची रक्कम ठरणार आहे. केंद्र सरकार लाभार्थीच्या खात्यात हप्त्याची अर्धी रक्कम भरणार आहे. लाभार्थीचा जर अकाली अथवा अपघाती मृत्यू झाला तर योजनेची पेन्शन पती अथवा पत्नीला मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थीचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 असणे गरजेच आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती वीमा योजना : या योजनेअंतर्गत लाभार्थीला फक्त 330 रुपये वार्षिक प्रिमियम भरावा लागणार असून त्याला 2 लांचा वीमा मिळणार आहे. 18 ते 50 वय असलेल्या व्यक्तींना या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे. तर काही बँकेत एसएमएसद्वारेही व्यवस्था करण्यात आलीये.

पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना : या योजनेअंतर्गत अपघातात मृत्त अथवा अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 2 लाखांचा वीमा मिळणार आहे. 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेसाठी लाभार्थीला वार्षिक 12 रुपये भरावे लागणार आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close