राज ठाकरेंनी घेतलं कुलदैवतेचं दर्शन

October 27, 2009 9:40 AM0 commentsViews: 48

27 ऑक्टोबर मनसेच्या 13 आमदारांनी मंगळवारी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत कार्ल्याच्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. कार्ल्याची एकवीरा देवी ठाकरे घराण्याचं कुलदैवत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभेत 13 आमदार निवडून आले आहेत. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने एवढं घवघवीत यश मिळवल्याने राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्ममध्ये आहेत. मनसेच्या उमेदवारांच्या, कार्यकर्त्यांच्या कामगिरीवर ते खूश आहेत. त्यामुळेच मंगळवारी राज यांनी आपल्या निवडून आलेल्या सर्व शिलेदारांसोबत एकवीरा देवीचं दर्शन घेतलं.

close