माओवाद्यांच्या तावडीतून आदिवासींची सुटका, 1 ठार

May 9, 2015 10:54 PM0 commentsViews:

naxal_movement09 मे : तब्बल 20 तासानंतर माओवाद्यांनी अपहरण केलेल्या आदिवासींची सुटका केलीय. मात्र एका आदिवासीला माओवाद्यांनी ठार केलंय. त्याचा मृतदेह घेऊन आदिवासी मारेंगा गावात परतले आहे. माओवाद्यांनी सदाराम या आदिवासीला ठार केलंय. विशेष म्हणजे माओवाद्यांनी आज गदीम आणि मुंगाच्या जंगलात जनअदालत घेतली. सरकार विरोधातली ही जनअदालत होती. गदीम आणि मुंगाच्या जंगलात या आदिवासींना ठेवण्यात आलं होतं.

दंतेवाडा आणि सुकमा जिल्हयाच्या सीमेवरील तोंगपाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मायेंगा आणि लगतच्या चार गावातून एक हजार नागरिकाना पाचशे सशस्त्र माओवाद्यांनी काल रात्रीसोबत नेलं होतं. अपहरणाच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्‍याला विरोध करण्यासह या भागात सुरू असलेल्या पुलाच्या कामाला विरोध असल्याने माओवाद्यांनी हे अपहरण केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close