मी नाराज नाही, पक्षाचा निर्णय मान्य- अजित पवार

October 27, 2009 9:53 AM0 commentsViews: 1

आपण नाराज नाही. आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य आहे, असं अजित पवारांनी आयबीएन-लोकमतला सांगितलं. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी त्यांनी बातचीत केली. पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. तसेच मंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपद हुकल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचा फोनही लागत नव्हता. पण अजित पवारांशी आयबीएन-लोकमतनं संपर्क केला. आपल्याबाबतच्या चर्चेला यावेळी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.

close