ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर कालवश

May 10, 2015 12:11 PM0 commentsViews:

ninad bedekar

10  मे : ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि व्याख्याते निनाद बेडेकर यांचे रविवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.

ते 65 वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निनाद बेडेकर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व होते.बेडेकर यांनी शिवचरित्र्यावर आत्तापर्यंत 5 हजारपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. खरंतर ते व्यवसायानं इंजीनियर होते आणि किर्लोसकर कंपनीत कामाला होते. पण इतिहास अभ्यासाचं वेड त्यांना गप्प बसू देई ना. किल्यांच्या भ्रमंतीचं त्यांना विशेष वेड होतं. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी जगभर भ्रमंती केली होती. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी 101 किल्ले भ्रमंती पूर्ण केली होती. याशिवाय, अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून ते इतिहासाविषयी लेखन केले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close